अ‍ॅपशहर

रमजान ईदसाठी पोलिस बंदोबस्त

मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे १६ जून रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे...

Maharashtra Times 15 Jun 2018, 3:59 am
औरंगाबाद : मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. १६ जून रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. हा सण शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस विभागातील तीन पोलिस उपायुक्त, सहा सहाय्यक पोलिस आयुक्त, २८ पोलिस निरीक्षक, ९९ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच पोलिस उपनिरिक्षक, ११६६ पोलिस कर्मचारी, ८३ महिला व पुरुष होमगार्ड व चा एसआरपीएफ कंपनी व १५० नवप्रविष्ठ पोलिस शिपाई असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेतला व महत्वाच्या सूचना दिल्या. रमजान ईदनिमित्त शहरामध्ये महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट व गस्तीपथके नेमण्यात आले आहेत. बॉम्बशोधक व नाशक पथक हे औरंगाबादमधील महत्त्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करणार आहे. अशी माहिती विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त एच. एस. भापकर यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज