अ‍ॅपशहर

नांदेड, सांगली-सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे त्रेधातिरपीट उडाली असली तरी, उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2018, 4:20 pm
नांदेड/सांगली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे त्रेधातिरपीट उडाली असली तरी, उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.

सांगली जिल्ह्यात सांगली शहर, तासगाव, मिरज आदी परिसरांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सांगली आणि तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मराठवाड्यातील नांदेडमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला.

दरम्यान, पुढील २४ तासांत मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज