अ‍ॅपशहर

औरंगाबाद-जालनामध्ये पावसाचे धुमशान सुरुच

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचे सुरु असलेले धुमशान कायम असून बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत औरंगाबाद, जालना जिल्ह्याला पावसाने झोडपुन काढले. दोन जिल्ह्यातील तब्बल २४ महसूली मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 1:49 pm
औरंगाबाद: गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचे सुरु असलेले धुमशान कायम असून बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत औरंगाबाद, जालना जिल्ह्याला पावसाने झोडपुन काढले. दोन जिल्ह्यातील तब्बल २४ महसूली मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raining-in-awb


शनिवारपासून मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे. बुधवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील आळंद, वडोदबाजार, सिल्लोड, अजिंठा, अंभई, भराडी, सावळदबारा, पिशोर, करंजखेड, नाचनवेल, चिंचोली तर जालना जिल्ह्यातील रामनगर, विरेगाव, पाचनवडगाव, वाग्रळ जहागीर, बावणे पांगरी, सिपोरा बाजार, पिंपळागव रे., राजुर, केदरखेड, अनवा, परतुर व वडीगोद्री मंडळामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.

या पावसानंतर औरंगाबाद जिल्ह्याने सरासरी ओलांडली असून, जालना जिल्हा सरासरी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९६.५८ टक्क्यांवर पोचली आहे. बुधवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक ४८.७५ मिलिमीटर, औरंगाबाद ३५.७४. परभणी ५.४३, हिंगोली १.७३, बीड १५.३६, लातूर ४.१६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १४.०३ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. गेल्या आठवड्याभरापुर्वी विभागातून गायब असलेल्या पावसाने आता सातत्य कायम ठेवले असून यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण काही प्रमाणात दूर होणार असली तरी पिकांचे मात्र नुकसान झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज