अ‍ॅपशहर

लता मंगेशकरांचे ४०० फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने दीदींच्या आठवणींना असा दिला उजाळा...

प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांनी लतादिदींच्या आठवणींना उजाळा देत आतापर्यंत दिदींचे कधीही समोर न आलेले फोटो प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे निकम यांना एका दिवसात दिदींचे ४०० फोटो काढण्याची संधी मिळाली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 7 Feb 2022, 8:25 am
औरंगाबाद : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर वयाच्या ९२ व्या वर्षी अनंतात विलीन झाल्या. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक घटना कायम स्मरणात राहणार आहेत. दिदींच्या अशाच काही आठवणींना औरंगाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांनी उजाळा देत आतापर्यंत दिदींचे कधीही समोर न आलेले फोटो प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे निकम यांना एका दिवसात दिदींचे ४०० फोटो काढण्याची संधी मिळाली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम remembring memories of lata mangeshkar by aurangabad photographer kishor Nikam
फोटोग्राफर किशोर निकम यांचा लतादिदींसोबतचा एक क्षण


लता मंगेशकर यांच्या 'मैत्र जीवांचे' या अल्बमच शूट २००४ साली झालं होतं. तसंच या दरम्यान ९ डिसेंबर २००४ रोजी पुण्याजवळच्या खडकवासला धरणाजवळ दिदींचं फोटो शूट पार पडलं होतं. यावेळी स्थिर छायाचित्रे काढण्याची संधी किशोर निकम यांना मिळाली होती. यावेळी निकम यांनी एका दिवसात दिदींचे तब्बल ४०० फोटो काढले होते. यावेळी लता मंगेशकर यांच्या दिवे लावताना, बागेत फिरताना, खळखळणाऱ्या पाण्याशी हितगुज करताना, अशा एक ना अनेक छायाचित्रे निकम यांनी टिपले होते.


दिदींच्या आठवणींना उजाळा देतांना किशोर निकम म्हणाले की, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासह मी आणि माझा एक मित्र फोटोशूटसाठी फार्म हाऊसवर पोहोचलो. यावेळी माझ्यावर प्रचंड दडपण होते, त्यातच समोर असलेल्या लतादीदींकडे पाहिल्यावर दडपण आणखीनच वाढले. पण दिदींनी आमची खूप जुनी ओळख असल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणून माझे स्वागत केले. त्यामुळे मनावर आलेलं दडपण क्षणात दूर झाले आणि फोटोसेशनला सुरवात झाली. तो एकदिवसाचा काळ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस राहणार असल्याचं निकम म्हणाले.

दिदींचे ते फोटो आले समोर.....

निकम यांनी दिदींचे त्यावेळी तब्बल ४०० फोटो क्लिक केले होते. त्यातील काही फोटो अल्बम मधून समोर आले होते. पण यातील अनेक फोटो आजपर्यंत कधीही समोर आले नव्हते. दिदींचे ते फोटो निकम यांनी आज प्रसिद्ध करत दिदींच्या आठवणींना उजाळा दिला.

महत्वाचे लेख