म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सलीम कुरेशी खून खटल्यात सुनावणीदरम्यान फितूर झालेल्या सात साक्षीदारांना कोर्टाने नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्या सात जणांना १५ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहून खुलासा द्यावा लागणार आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी ६१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते. त्यांच्यापैकी ११ साक्षीदार फितूर झाले होते. यामध्ये योगेश गंगावणे, संदीप कस्तुरे, राजेंद्र कोतकर, प्रवीण म्हस्के, फिरोज खान अकबर खान, महंमद अल्लाउद्दीन महंमद मुजाउद्दीन व सैय्यद एजाज सैय्यद अमजद यांना नोटीस बजावण्याचे आदेशात म्हटले आहे.