अ‍ॅपशहर

आम्ही शिवसेनेसोबत! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक रस्त्यावर, औरंगाबादमध्ये निदर्शने

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी आज क्रांतिचौक येथे शिवसेनेच्यावतीने निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2022, 11:59 am
औरंगाबाद : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी आज क्रांतिचौक येथे शिवसेनेच्यावतीने निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena


औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना संपली अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी व औरंगाबादेतील शिवसेनेला कुठलाही धक्का लागला नाही हे दाखविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आली.

एकनाथ शिंदेंसोबत सकाळी माझी १ तास चर्चा; राऊतांच्या दाव्याने नाराजीनाट्यात नवा ट्विस्ट
या वेळी बंडखोर आमदार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैध, बाडू थोरात, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप,सुनीता आहुलवार आदीं उपस्थित होते.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख