अ‍ॅपशहर

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात; १५ ते १६ वाहनांचा चुराडा

Accident In Aurangabad : खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे ते दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2022, 7:31 pm
औरंगाबाद : दौलताबाद येथील समृद्धी महमार्गावरून जात असताना शिंदे गटातील नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला आहे. या अपघातात १५ ते १६ वाहनांचा चुराडा झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arjun khotkar accident 1
अर्जुन खोतकर ताफा अपघात


शिवसेनेसाठी पक्षातील सर्वात मोठ्या बंडानंतरचा पहिला, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगाच्या दरबारात लागेलच, पण त्याआधी खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे ते दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. आपल्याच मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमावी यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार नियोजन करण्यात आले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ट्रक चालकाचं कारला वाचवताना नियंत्रण सुटलं, रिक्षाला चिरडलं, १० जणांचा मृत्यू ७ जण जखमी

याच दसरा मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे निघाले होते. मात्र दौलताबादजवळ आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला.

बीकेसीची पाहणी, थेट माईक हातात घेऊन नांगरे पाटलांचे पोलिसांना ३ रोखठोक आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सूचना

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसी येथे पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून ३० हजारांहून अधिक बस येणार असल्याची चर्चा आहे. या बस उभ्या करण्यासाठी बीकेसीलगत असलेली मुंबई विद्यापीठाची जागा निश्चित करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज