औरंगाबाद : एसटी महामंडळाने दिवाळीच्या सीझनमध्ये एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एसटी महामंडळाने गुरुवारी मध्यरात्रीपासून १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान ही दरवाढ लागू असणार आहे. ही दरवाढ गुरुवारी (२४ ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून ही लागू केली जाणार आहे. साधी, सेमी (एशियाड) आणि शिवशाही आसनी बसची २५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीसाठी १० टक्के भाडेवाढ होणार, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. शिवनेरी, शिवशाही स्लीपर, अश्वमेध या बसच्या प्रवाशांची प्रवास भाव वाढ करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दिवाळीच्या सुटीत एसटी महाग
एसटी महामंडळाने दिवाळीच्या सीझनमध्ये एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2019, 4:00 am