अ‍ॅपशहर

मुंबई शहरला दुहेरी मुकुट

एकोणतिसाव्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने महिला व पुरुष गटात सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अॅथलीटचा बहुमान कोल्हापूर परिक्षेत्रच्या जयश्री बोरगे आणि बिपीन ढवळे यांनी मिळवला.

Maharashtra Times 13 Jan 2017, 3:35 am
मुंबई शहरला दुहेरी मुकुट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम state police sports competition
मुंबई शहरला दुहेरी मुकुट

दोन्ही गटांत सर्वसाधारण विजेतेपद; जयश्री, बिपीन सर्वोत्कृष्ट अॅथलीट
राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकोणतिसाव्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने महिला व पुरुष गटात सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अॅथलीटचा बहुमान कोल्हापूर परिक्षेत्रच्या जयश्री बोरगे आणि बिपीन ढवळे यांनी मिळवला.
भारत राखीव बटालियनच्या परिसरात राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा शानदार सोहळ्यात समारोप झाला. राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अप्पर मुख्य सचिव (गृह) श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथुर, विशेष पोलिस महानिरीक्षक अर्चना त्यागी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, पोलिस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी निधी पांडेय, भारत राखीव बटालियनचे समादेशक निसार तांबोळी, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती, रामेश्वर थोरात, पोलिस निरिक्षक मधुकर सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
अखेरच्या दिवशी झालेल्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये पुरुष गटात कोल्हापूर परिक्षेत्रच्या बिपीन ढवळेने, तर महिला गटात प्रशिक्षण संचलनालयाच्या मंजिरी व्यवहारेने सुवर्णपदकाची कमाई केली. बिपीनने १०.६ सेकंदांमध्ये १०० मी. अंतर पार केले. ठाणे शहरच्या वैभव एडगेने (१०.७ से.) रौप्य, तर मुंबई शहरच्या अमोल लोखंडेने (१०.९ से.) ब्राँझपदक निश्चित केले. महिला गटात मंजिरी व्यवहारेने १२.८ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटाकाविले. मुंबई शहरच्या स्वाती भिलारेने (१३.१ से.) रौप्यपदक मिळविले, मुंबई शहरच्याच माधुरी थिरमे (१३.५ से.) ब्राँझपदकाची मानकरी ठरली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अॅथलीट ठरलेल्या जयश्री बोरगे व बिपीन ढवळे यांना पदकांसह दुचाकी वाहन असे विशेष बक्षीस राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अंतिम निकाल ः सर्वसाधारण विजेतेपद (पुरुष) - १. मुंबई शहर, २. राज्य राखीव पोलिस दल, ३. कोल्हापूर. महिला - १. मुंबई शहर, २. कोल्हापूर, ३. प्रशिक्षण संचनालय.
१०० मीटर धावणे - १. बिपीन ढवळे (१०.६ से., कोल्हापूर), २. वैभव एडगे (१०.७ से., ठाणे), ३. अमोल लोखंडे (१०.९ से., मुंबई). महिला - १. मंजिरी व्यवहारे (१२.८ से., प्रशिक्षण संचनालय), २. स्वाती भिलारे (१३.१ से., मुंबई), ३. माधुरी थिरमे (१३.५ से., मुंबई).
१५ मी. ग्रुपिंग फायर - १. दिलीप झाळके (२० गुण, नागपूर), २. दत्ता शिंदे (२०, सांगली), ३. रवींद्र कुमार सिंघल (नाशिक), विश्वास नांगरे पाटील (कोल्हापूर), निखिल पिंगळे (एसआरपीएफ, २० गुण).
१५ मीटर अॅप्लिकेशन फायर - १. दत्ता शिंदे (५९ गुण, सांगली), २. रवींद्र कुमार सिंघल (५७ गुण, नाशिक), ३. विश्वास नांगरे पाटील (५७ गुण, कोल्हापूर).
१५ मीटर अॅप्लिकेशन फायर - १. दत्ता शिंदे (५३ गुण, सांगली), २. शामराव दिघावकर (५० गुण, एसआरपीएफ), ३. निखिल पिंगळे (४९ गुण, सोलापूर).
२५ मीटर पॉइंट २२ रायफल फायर - १. वंदना फुलारी (९३ गुण), २. रोशिता कुमार (८८ गुण), ३. रुपाली नागरे पाटील (८५ गुण).
सर्वोत्कृष्ट नेमबाज - दत्ता शिंदे (१३२ गुण, सांगली).
हॉकी (पुरुष) - १. एसआरपीएफ, २. कोल्हापूर, ३. रेल्वे.
फुटबॉल (पुरुष) - १. नागपूर, २. कोल्हापूर, ३. एसआरपीएफ.
हँडबॉल (पुरुष) - १. मुंबई, २. कोकण, ३. कोल्हापूर.
वेटलिफ्टिंग (पुरुष) - १. मुंबई, २. कोल्हापूर, ३. नागपूर. महिला - १. मुंबई, २. रेल्वे, ३. कोल्हापूर.
जलतरण (पुरुष) - १. मुंबई, २. कोल्हापूर, ३. एसआरपीएफ.
ज्युदो (पुरुष) - १. मुंबई, २. एसआरपीएफ, ३. नाशिक व कोकण. महिला - १. मुंबई शहर, २. ठाणे, ३. कोल्हापूर.
कबड्डी (पुरुष) - १. एसआरपीएफ, २. मुंबई, ३. कोल्हापूर. महिला - १. कोकण, २. मुंबई, ३. प्रशिक्षण संचनालय.
क्रॉसकंट्री (पुरुष) - १. मुंबई, २. कोल्हापूर, ३. प्रशिक्षण संचनालय.
व्हॉलिबॉल (पुरुष) - १. मुंबई, २. पुणे, ३. रेल्वे. महिला - १. अमरावती, २. नागपूर, ३. पुणे.
बास्केटबॉल (पुरुष) - १. कोल्हापूर, २. मुंबई, ३. एसआरपीएफ. महिला - १. अमरावती, २. रेल्वे, ३. नाशिक.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज