म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी रात्री दहा वाजता ही व्यक्ती जालना रोडवरील समाधान हॉटेलवर जखमी अवस्थेत आढळून आली होती. घाटीत उपचार सुरू असताना ही व्यक्ती मरण पावली.
समाधान हॉटेलसमोर ३५ वर्षे वयाची एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. या व्यक्तीला तातडीने रूग्णवाहिकेमध्ये घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीची उंची पाच फूट दोन इंच, रंग निमगोरा, पायात गुलाबी रंगाची चप्पल, नारंगी रंगाचा शर्ट, अंगात जय संताजी मित्र मंडळाचा पिवळ्या रंगाचा टी शर्ट, विटकरी रंगाची पँट आहे. या अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास चिकलठाणा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.