अ‍ॅपशहर

कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या जप्त

रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाज करत जोरजोरात वाहने चालविणाऱ्या चालकांना पोलिसांनी जबर झटका देत आठ दुचाकी आणि एक कार जप्त केली...

Maharashtra Times 21 Oct 2018, 4:00 am

औरंगाबाद : रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाज करत जोरजोरात वाहने चालविणाऱ्या चालकांना पोलिसांनी जबर झटका देत आठ दुचाकी आणि एक कार जप्त केली. बुलेट किंवा अन्य वाहनांमध्ये विशेष प्रकारचे सायलेन्सर लावून त्यांचा आवाज मोठा केला जातो. अनेकदा फटाके फोडल्याचा आवाज होतो. त्यामुळे रस्त्यावरील सामान्य गोंधळून जातात. अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळे शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी आठ मोटारसायकल जप्त केल्या. ही वाहने मध्यवर्ती बस स्थानक येथील वर्कशॉपमध्ये लावण्यात आली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज