अ‍ॅपशहर

समायोजन न केल्याने १८८ शिक्षक संकटात

अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्यास शैक्षणिक संस्थांची नकारघंटा कायम आहे. औरंगाबाद विभागात २२२पैकी केवळ ३४ शिक्षकांचेच समायोजन झाले आहे. त्यामुळे १८८ शिक्षक अधांतरीच आहेत.

Maharashtra Times 1 Dec 2016, 3:00 am
औरंगाबाद : अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्यास शैक्षणिक संस्थांची नकारघंटा कायम आहे. औरंगाबाद विभागात २२२पैकी केवळ ३४ शिक्षकांचेच समायोजन झाले आहे. त्यामुळे १८८ शिक्षक अधांतरीच आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers appointment issue
समायोजन न केल्याने १८८ शिक्षक संकटात

विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचा प्रश्न अद्याप निकाली काढण्यात शिक्षण विभागाला यश आलेले नाही. रिक्त असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु शैक्षणिक संस्थां त्यांना रुजू करून घेत नाहीत. शिक्षण विभागाच्या कारभार, संस्था चालकांच्या मनमानीमुळे हा प्रश्न सुटलेला नाही. या शिक्षकांना संबंधित शाळा समायोजित करून घेण्यास तयार नाहीत. विभागातील पाच जिल्ह्यांत प्राथमिक व माध्यमिकस्तरावर २२२ शिक्षक अतिरिक्त ठरले. प्राथमिकस्तरावर ७४, तर माध्यमिकस्तरावर १४८ शिक्षकांचा समावेश आहे. त्यातील १६ प्राथमिक व १८ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले आहे.

शिक्षण विभाग सुस्तच..
शैक्षणिक संस्था समायोजन करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न रखडलेला आहे. समायोजन न करणाऱ्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांचे वेतन थांबविण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. त्यानंतरही हा प्रश्न निकाली निघालेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज