अ‍ॅपशहर

‘सचिन’च्या उपचारासाठी पुण्याहून डॉक्टर येणार

म टा प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन हा पांढरा वाघ २० ऑगस्टपासून आजारी आहे...

Maharashtra Times 29 Aug 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सचिन हा पांढरा वाघ २० ऑगस्टपासून आजारी आहे. त्याने खाणे-पिणे सोडल्यामुळे तो अत्यावस्थ आहे. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने त्याच्यावर उपचार केले जात होते, पण त्याचा फार उपयोग झाला नाही. त्यामुळे पुणे येथील प्राणिसंग्रहालयातील डॉ. राजकुमार जाधव यांना सचिनवर उपचार करण्यासाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी किंवा गुरुवारी ते शहरात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहलायचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज