औरंगाबाद: 'असा मी घडलो-गाथा ग्रंथापालांच्या' या संपादित ग्रंथाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत शनिवारी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी कृषीतज्ज्ञ डॉ. एस. बी. वराडे, डॉ. वि. ल. धारुरकर आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपाद प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणजीत धर्मापुरीकर व डॉ. मेघा धर्मापुरीकर यांनी केले आहे.
‘असा मी घडलो’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन
'असा मी घडलो-गाथा ग्रंथापालांच्या' या संपादित ग्रंथाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे...
Maharashtra Times 4 Jun 2018, 4:00 am