म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजता www.maharesults.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहण्यास मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या राज्यातील नऊ विभागीय मंडळात एकाच वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार आहे.