अ‍ॅपशहर

बदनामीची धमकी; दोघांना पोलिस कोठडी

सुनेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करून शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती माहिती पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले यांनी दिली.

Maharashtra Times 17 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम threat of defamation
बदनामीची धमकी; दोघांना पोलिस कोठडी

सुनेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करून शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती माहिती पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांतननगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या व्यक्तिला त्याच्या सुनेची बदनामी करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. हा प्रकार ऑगस्ट २०१६ पासून सुरू होता. विजेंदर उर्फ नयन आणि पृथ्वीराज उर्फ प्रिती (रा. नांदेड), अशी संशयित आरोपींचा नावे आहेत. त्यांना या कुटुंबाने प्रतिसाद न दिल्याने सुनेचे छायाचित्र सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे या कुटुंबाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोघे या महिलेच्या सासऱ्या फोन करून खंडणी मागत होते. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबामार्फत त्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने शहरात बोलावून अटक केली.

तरुणीचे शोषण

सोशल मिडियावर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक शोषण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी ते ५ जुलै या काळात यासीन इब्राहीम शेख (रा. खैसर कली, चंपा चौक) याने तिचे अर्धनग्न फोटो नकळत काढले. हे फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्या बहिणीचे लग्न मोडीन, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बळजबरीने घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज