वैजापूर : चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटल्याने ट्रकमधील तब्बल ५० शेळ्या दबून मृत्युमुखी पडल्याची घटना औरंगाबाद रस्त्यावर झोलेगाव (ता. वैजापूर) शिवारात शुक्रवारी (सात फेब्रुवारी) पहाटे घडली. या घटनेत चालक व क्लिनर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील ट्रक (जीजे ३१ टी १९८३) १७० शेळ्या घेऊन गुजरात येथून जालन्याकडे जात होता. नाशिक, औरंगाबाद महामार्गावर गारजजवळ झोलेगाव शिवारात असलेल्या खडकी पुलावर ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरिल कठड्याला धडकला. कठडा तोडून ट्रक सुमारे दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात पडून अपघात झाला. या घटनेत ट्रकमधील ५० शेळ्यांचा दबून जागीच मृत्यू झाला. काही शेळ्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिस नाईक रवींद्र काळे, सुभाष बकले, आर. आर. जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने शेळ्या, चालक व क्लिनरला बाहेर काढले.
ट्रक उलटल्याने५० शेळ्या मृत्युमुखी
चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटल्याने ट्रकमधील तब्बल ५० शेळ्या दबून मृत्युमुखी पडल्याची घटना औरंगाबाद रस्त्यावर झोलेगाव (ता...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2020, 4:00 am