औरंगाबाद: लग्न समारंभ आटोपून घरी जाणाऱ्या एका महिलेच मंगळसूत्र हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने हिसकवून पळ काढला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता बीड बायपासवरील छत्रपतीनगरमध्ये घडली. संध्या किरण नवगिरे या कल्याणी बालक मंदिराजवळून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील गंठणला झटका देत ओढले व भरधाव वेगात पोबारा केला. संध्या यांचे पती किरण यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोकळा परिसर असल्याने चोरांनी वेगात जात पोबारा केला. यात त्यांचे तीन तोळ्याचे गंठण चोरीला गेले असून रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुचाकीस्वाराकडून मंगळसूत्र चोरी
लग्न समारंभ आटोपून घरी जाणाऱ्या एका महिलेच मंगळसूत्र हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने हिसकवून पळ काढला...
Maharashtra Times 18 Jun 2018, 4:00 am