औरंगाबाद : महाबिझीनेस नेटवर्क (एमबीएन) व रयत ट्रेडींग कंपनीच्या वतीने भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी.) प्रमुख हनुमंतराव गायकवाड यांचे 'शेती उत्पन्नवाढ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. एमजीएम कॅम्पसमधील आर्यभट्ट सभागृहात रविवारी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, वित्त विभागाचे सहायक संचालक कल्याणराव औताडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे राम पवार, प्रदीप सोळुंके यांनी कळवले आहे.
गायकवाड यांचे आज व्याख्यान
महाबिझीनेस नेटवर्क (एमबीएन) व रयत ट्रेडींग कंपनीच्या वतीने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी...
Maharashtra Times 10 Jun 2018, 4:00 am