अ‍ॅपशहर

Tomato Price Hike Today: सर्वसामान्यांना आता टोमॅटोचा झटका, नवे दर वाचून हादराल...

ऐन महागाईत आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. कारण, टोमॅटोच्या भावांमध्ये मोठ्या प्रामाणात वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 1:46 pm

मुंबई ते पुणे गाठा फक्त ९० मिनिटांत, कसा असणार नवा मार्ग; वाचा सविस्तर...

औरंगाबाद : महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामांन्याना आणखी एक झटका देणारी बातमी आहे. कारण, अवघ्या २० ते ३० रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोने आता भाव खाल्ला आहे. बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर ७० रुपये ते १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. दररोजच्या वापरातील टोमॅटोचे दर भडकल्याने गृहणीचं बजेट कोलमडणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tomato price hike
tomato price hike


काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी औरंगाबादेत टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. मात्र, आता टोमॅटोचा भाव वधारला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटो उत्पादन कमी घेतलं. परिणामी टोमॅटोची कमतरता दिसून येते.


दररोजच्या जेवणामध्ये टॉमेटोचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आवक घटल्याने टोमेटॉची मागणी वाढली. आवक कमी आणि मागणी वाढल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या औरंगाबाद शहरात ठोक विमरीचे दर ८०० रुपये प्रति कॅरेट (साधारण २० किलो) आहे. तर बाजारात ७० ते १०० रुपये प्रति किलो ग्राहकांना विकला जात आहे. तसेच आगामी काही दिवसात टोमॅटोची आवक न वाढल्यास सर्वसामांन्याना आणखी चढ्या दराने टोमॅटो खरेदी करावा लागू शकतो.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज