औरंगाबाद: मनमाडहून नगरसोलला जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनमध्ये ऑइल गळती होऊन, इंजिनला आग लागल्याची घटना अंकाईजवळ मंगळवारी रात्री घडली. लोको पायलटने वेळीच रेल्वे रोखल्यामुळे अनर्थ टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरसोल-नांदेड पॅसेंजरच्या (५७५४१) इंजिनमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला. मनमाड येथून इंजिन पाठवून ही रेल्वे नगरसोलला आणण्यात आली. या घटनेमुळे सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ही दीड तास नगरसोलला थांबवून ठेवण्यात आली.
रेल्वेचे इंजिन फेल
मनमाडहून नगरसोलला जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनमध्ये ऑइल गळती होऊन, इंजिनला आग लागल्याची घटना अंकाईजवळ मंगळवारी रात्री घडली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2019, 4:00 am