अ‍ॅपशहर

एमजीएमतर्फे ट्रायथलॉन स्पर्धा

महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) चौतिसाव्या स्थापनादिनानिमित्त २५ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन आणि ड्युथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 26 Oct 2016, 3:26 am
एमजीएमतर्फे ट्रायथलॉन स्पर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trithelon competition
एमजीएमतर्फे ट्रायथलॉन स्पर्धा

औरंगाबाद ः महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) चौतिसाव्या स्थापनादिनानिमित्त २५ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन आणि ड्युथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
एमजीएम क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. ट्रायथलॉन स्पर्धेत ७५० मीटर जलतरण, २० किलोमीटर सायकल शर्यत व पाच किलोमीटर धावण्याची शर्यत यांचा समावेश आहे. सुपर स्प्रिंटमध्ये ४०० मीटर जलतरण, १० किलोमीटर सायकल शर्यत व २.५ किलोमीटर धावण्याची शर्यत यांचा समावेश आहे. ट्रायथलॉन स्पर्धेच्या फन श्रेणीत १०० मीटर जलतरण, ५ किलोमीटर सायकल शर्यत आणि ३ किलोमीटर धावण्याची शर्यत असेल. लहान मुलांच्या ट्रायथलॉनमध्ये ५० मीटर जलतरण, २ किलोमीटर सायकल शर्यत आणि १ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीचा समावेश आहे.
ड्युथलॉन स्पर्धेत २० किलोमीटर सायकल चालवणे, पाच किलोमीटर धावण्याचा समावेश आहे. सुपरस्प्रिंट स्पर्धेत दोन किलोमीटर धावणे, दहा किलोमीटर सायकल शर्यत असणार आहे. अधिक माहितीसाठी www.mgmeducationunlimited.com या संकेतस्थळास भेट द्यावी. या स्पर्धेसाठी १५ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज