अ‍ॅपशहर

भिंत कोसळून दोन बालके ठार

Maharashtra Times 21 Aug 2017, 3:00 am
वाळूज महानगर : रांजणगाव येथे मुलाना खेळण्यासाठी घरातील भिंतीला बांधलेला झोक्यामुळे भिंत कोसळून बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता दत्तनगरमध्ये घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two children died in wall collapse
भिंत कोसळून दोन बालके ठार

रांजणगावातील दत्तनगरमध्ये शब्बीर अमीनखाँ पठाण यांची दोन मजली इमारत आहे. या इमारतीतमध्ये चार वर्षांपासून सुरेश भानुदास गाडगिले हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबात मुंजाजी गाडगिले (वय १२), सरगम गाडगिले (वय १०), श्रद्धा गाडगिले (वय ८), रमा गाडगिले (वय ६) व संध्या गाडगिले (वय ४) ही पाच मुले आहेत. रविवारची सुटी असल्याने सर्व मुले घरात एकत्र खेळत होती. घरातील भांडी ठेवण्यासाठी बांधलेल्या भिंतीला झोका बांधण्यात आला होता. या भिंतीकरिता दगडी फरशीचा वापर करण्यात आला होता. या भिंतीला साडीच्या साहाय्याने दोन झोके बांधलेले होते. त्या झोक्यात बसून मुले खेळताना अचानक दगडी फरशी असलेली भिंत झोक्यावर कोसळली. त्यामुळे झोक्यात बसलेली रमा (वय ६) व मुंजाजी (वय १२) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. त्यांच्या सोबत खेळणारी श्रद्धा (वय ८) ही जखमी झाली. ही घटना घडताच जोरात आरडाओरड झाल्याने शेजारी मदतीला धावून आले. भिंतीच्या दगडी फरशी खाली दबलेले बहीण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली.

झोका भिंतीला बांधलेला
घरातील भांडी ठेवण्यासाठी बांधलेल्या भिंतीला झोका बांधण्यात आला होता. या भिंतीकरिता दगडी फरशीचा वापर करण्यात आला होता. या भिंतीला साडीच्या साहाय्याने दोन झोके बांधलेले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज