औरंगाबाद : बीड बायपास रोडवर बुधवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. निशांत पार्क हॉटेलसमोर हा अपघात घडला. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावणेआठच्या सुमारास गोदावरी टी पॉइंटकडून महानुभाव आश्रमाच्या दिशेने एक ट्रक जात होता. निशांत पार्कसमोर असलेल्या हॉटेल टिलूज टचच्या अलीकडे या ट्रकचे ब्रेक फेल झाले. हा ट्रक दोन कार व एका पिकअप व्हॅनवर जाऊन आदळला. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातामुळे पाऊण तास वाहतूक खोळंबली होती.
ट्रकची दोन कार, पिकअप व्हॅनला धडक
बीड बायपास रोडवर बुधवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले निशांत पार्क हॉटेलसमोर हा अपघात घडला...
Maharashtra Times 9 Aug 2018, 4:00 am