औरंगाबाद : चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने बुधवारी महावीर चौकात बेड्या ठोकल्या. चोरलेली दुचाकी करमाड हद्दीतील असल्याने आरोपीला दुचाकीसहीत करमाड पोलिसांच्या ताब्यात दिले. कादर बेग सलीम बेग (वय २५, रा. कागजीपुरा, खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ही दुचाकी करमाड येथून साथीदाराच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेने आरोपी कदीर बेगला दुचाकीसह करमाड पोलिसांच्या स्वाधीन केले.
दुचाकी चोर जाळ्यात
चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने बुधवारी महावीर चौकात बेड्या ठोकल्या...
Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am