औरंगाबाद : वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांची मद्यपींनी छेड काढल्याचे प्रकार मुकुंदवाडी भागात घडले. याप्रकरणी संशयितांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी (दोन मे) गुन्ह्याची नोंद झाली. पहिली घटना मुकुंदवाडीत मंगळवारी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास घडली. २४ वर्षीय महिलेच्या घरासमोर किशोर रमेश चव्हाण याने दारुच्या नशेत येऊन शिवीगाळ केली. महिला त्याची समजूत काढीत असताना तिच्याशी अश्लिल भाषा वापरून विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत नमूद केले. मंगळवारीच मुकुंदवाडीमध्ये २७ वर्षांची महिला घरासमोर असताना दारू पिऊन आलेल्या श्याम जोशी या व्यक्तीने घरासमोर उभे राहून गाणे गायला सुरू केले. महिला समजावून सांगत असताना तिच्याशी अश्लिल हावभाव केला. यानंतर महिलेला व तिच्या आईला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दोन महिलांची मद्यपींकडून छेड
वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांची मद्यपींनी छेड काढल्याचे प्रकार मुकुंदवाडी भागात घडले...
Maharashtra Times 4 May 2018, 5:00 am