अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी बजावली कारणे दाखवा नोटीस, भाजप पदाधिकारी संतप्त

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीरसभा होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2022, 2:10 pm
औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ पदाधिकाऱ्यांना १११ प्रमाणे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये चुकीची भाषा वापरल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray sabha in aurangabad police issues notice to bjp workers
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी बजावली कारणे दाखवा नोटीस, भाजप पदाधिकारी संतप्त


पाणी प्रश्नावरून ४ एप्रिलला भाजपने चिष्टीया कॉलनीच्या जलकुंभावर आंदोलन केले होते. मात्र तेथे मनपाचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारायला आले नव्हते. यामुळे संतप्त आंदोलक मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या दिल्लीगेट येथील 'जलश्री' या शासकीय निवासस्थानावर धडकले होते. व त्यांच्या घराबाहेर ठिय्या देत आंदोलन केले होते. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या प्रकरणाचा संदर्भदेत पोलिसांनी भाजप पदाधिकारीना मोबाइलवर नोटीस पाठवल्या. आज आज हजर राहण्यास सांगितले. सर्व भाजप पदाधिकारी साह्ययक आयुक्त कार्यालयात पोहोचले तेंव्हा तारीख वाढवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नोटीसमध्ये काय आहे उल्लेख..

तुम्ही आडदांड व कोणतीही परवानगी नसताना अडथळा निर्माण करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याचे स्वभावाचे दिसून येत असून आगामी काळात तुमच्याकडून सदर कारणावरून वाद होऊन त्यातून एखादा शरीरा विरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते वगैरे रिपोर्टमध्ये नमूद आहे. यावरून तुम्ही वरील प्रमाणे कृत्य केल्याबाबत आमची खात्री झाली आहे. तुमचेकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून त्यातून तुम्ही राहात असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, असे आमचे मत झाले आहे. त्यामुळे तुम्हास हमीदारा शिवाय मोकळे सोडणे उचित वाटत नाही, असे पोलिसांच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. यावरच भाजप पदाधिकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

आमचे आंदोलन दहशत निर्माण करण्यासाठी नाही पाण्यासाठी

पोलीस म्हणतात आम्ही दहशत निर्माण करतो. मात्र, आम्ही शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होतो. आम्ही नोटिशीला घाबरत नाही. जनतेला पाणी मिळावे यासाठी वेळप्रसंगी कारागृहात जायला तयार आहोत.

- नितीन चित्ते, माजी नगरसेवक, भाजप

शिवसेनेच्या 'त्या' ७ आमदारांवर मुंबईच्या नेत्यांचा 'वॉच'!; चर्चेला उधाण

पोलिसांच्या नोटिशीला आम्ही घाबरणार नाही

आम्ही स्वतःच्या मुलांना कधी मारलेलं नाही. आणि पोलीस आमच्याबद्दल आडदांड अशी भाषा वापरतात. त्यावर आमचा आक्षेप आहे. पाणी प्रश्नावरून आम्ही मागे हटणार नाही. कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही.

- ऍड.माधुरी आदवांत, माजी नगरसेवक, भाजप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज