अ‍ॅपशहर

Ukraine Russia News : राज्याचं टेन्शन वाढलं, युक्रेनमध्ये मराठवाड्यातील ६२ विद्यार्थी अडकले

मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील ६२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ज्यात सर्वाधिक २१ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहे.

Maharashtra Times 25 Feb 2022, 3:07 pm
औरंगाबाद :रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरवात झाली असून, राज्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील ६२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ज्यात सर्वाधिक २१ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ukraine students news


रशियाने यूक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. ज्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मराठवाड्यातील ६२ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ०४, जालना ०७, नांदेड १९, परभणी ०४, लातूर २१ तर उस्मानाबाद येथील ०६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे.

Russia Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी कसं आणणार?; मोदींचा मास्टर प्लान तयार
औरंगाबाद जिल्ह्यातील चार विद्यार्थी....

औरंगाबादची भूमिका शार्दूल ही वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेली आहे. तर श्रुतिका चव्हाणही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिकत असून, ती व भूमिका एकाच हाेस्टेलमध्ये राहतात. त्याचप्रमाणे पैठण तालुक्यातील फारोळा गावातील अजिंक्य जाधव हा सुद्धा युक्रेनमध्ये एमबीबीएसच शिक्षण घेत आहे. तसेच प्रतीक अरुण ठाकरे सुध्दा युक्रेनमध्ये अडकला आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत अजिंक्य जाधव यांची माहिती नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज