अ‍ॅपशहर

गावाकडे जाताना वाटेत बोलेरोची जोरदार धडक, दुचाकीवरील काका-पुतणीचा दुर्दैवी अंत

Accident News: गावाकडे जाताना रस्त्यात बोलेरो जपीची धडक होऊन एका काका आणि पुतणीने जीव गमावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली आहे. यामुळे पालखेड गावावर शोककळा पसरली आहे.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2023, 12:45 am
छत्रपती संभाजीनगर: मोटारसायकलने गावाकडे परतणाऱ्या काका आणि पुतणीचा बोलेरो जीपच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याचे घटना नागपूर-मुंबई महामार्गावर घडली आहे. तालुक्यातील शिवराई शिवारात गुरुवारी २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नारायण कारभारी शेळके (वय ४५) आणि पूजा वेणूनाथ शेळके (वय २१) (रा. पालखेड) असे मृत काका आणि पुतणीची नावं आहेत. दरम्यान, पालखेड येथील चौघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काका आणि पुतणीच्या अपघाती निधनाने गावावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Accident news


याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण हे गुरुवारी दुपारी त्यांची पुतणी पूजाला सोबत घेऊन मोटारसायकलने (एमएच २० एफ. ई. ४०६१) नागपूर-मुंबई महामार्गाने वैजापूरहुन पालखेड येथे त्यांच्या गावी जात होते. शिवराई शिवारात पोहोचताच लासूरहून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडी (एम.एच. २५ आर ३५५४) विरोबा मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत नारायण आणि पूजा या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोउपनि रज्जाक शेख आणि संतोष सोनवणे हे करत आहेत


पालंखेड गावावर दुसऱ्यांदा शोककळा


गंगापुर तालुक्यातील कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत वैजापूर येथील पालखेड गावातील बाबासाहेब अशोक गोरे (वय ३५), नागेश दिलीप गोरे (वय २०), अक्षय भागिनाथ गोरे (वय २०) शंकर पारसनाथ घोडके (वय २२) असे चार जण याच महिन्यात सुमारे दोन आठवड्यापूर्वी बुडून मृत्यू पावले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा या गावावर पुतणी आणि काका यांचा अपघाती मृत्यू झाल्याने दुसऱ्यांदा शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख