औरंगाबाद : वाढती गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने एमपीडीए कायद्यानुसार एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर मंगळवारी स्थानबद्धतेची कारवाई केली. सय्यद मतीन याच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, जाळपोळ करून नुकसान करणे, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणे असे गुन्हे सिटी चौक, क्रांतीचौक, जिन्सी या पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मतीनच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलिस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, प्रक्रिया चालू असतानाच मतीनच्या गुन्ह्यात वाढ झाली. त्यामुळे अखेर मध्यवर्ती कारागृहात त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
‘एमपीडीए’खाली नगरसेवक मतीन स्थानबद्ध
वाढती गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने एमपीडीए कायद्यानुसार एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर मंगळवारी स्थानबद्धतेची ...
Maharashtra Times 22 Aug 2018, 4:00 am