अ‍ॅपशहर

​आत्महत्या करत असल्याचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाची उडाली खळबळ

पीक बहरत असताना पिकात वाढलेला तण कमी करण्यासाठी त्यांनी गावातील कृषी केंद्र चालकांकडून तणनाशक आणून फवारणी केली. मात्र, ८ दिवसातच तण जळण्याऐवजी सोयाबीनच जळून गेल्याचे समोर आले.

Maharashtra Times 20 Jan 2022, 9:04 am
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोशल मीडियावर काल दिवसभर एका शेतकऱ्याचा आत्महत्या करीत असल्याचा सांगणारा व्हिडीओ व्हायरल होत होता. सोयाबीन पिकाचे नुकसान झाले म्हणून कोटनांद्रा ता. सिल्लोड येथील शेतकरी कैलास रंगनाथ काकडे यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer news


मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा शिवारातील शेतकरी कैलास काकडे यांनी रबी हंगामात एक एकर सोयाबीन पेरणी केली. पीक बहरत असताना पिकात वाढलेला तण कमी करण्यासाठी त्यांनी गावातील कृषी केंद्र चालकांकडून तणनाशक आणून फवारणी केली. मात्र, ८ दिवसातच तण जळण्याऐवजी सोयाबीनच जळून गेल्याचे समोर आले.

यामुळे काकडे यांनी घडलेला सर्व प्रकार कृषी सेवा केंद्रचालकास सांगितला. त्यानंतर कृषी सेवा केंद्रा चालकाच्या मदतीने संबंधित औषध कंपनीच्या प्रतिनिधीला घटनास्थळी बोलावत पाहणी केली. पण पाहणी करूनही औषध कंपनीकडून कोणताही प्रतिसाद आणि मदत मिळत नसल्याचे समोर आले. अखेर हताश झालेल्या कैलास काकडे यांनी बुधवारी दुपारी नुकसान भरपाई मिळत नसल्याचे तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी त्वरित न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मी आत्महत्या करेल, असा व्हिडिओ व्हायरल केला.

काही वेळातच हा व्हायरल व्हिडिओ जिल्ह्याभरातील लोकांच्या मोबाईलमध्ये पोहचला आणि त्यामुळे प्रशासन सुद्धा खडबडून जागे झालं. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी संबंधित औषध कंपनीशी बोलणं करत दोन दिवसात कंपनीचे अधिकारी घटनास्थळी येणार असल्याची माहिती दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज