अ‍ॅपशहर

​ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

रेल्वे स्टेशन समोरील पेट्रोल पंप प्रकरणात काहीच कारवाई होत नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध करून शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी स्थायी समितीतून बुधवारी सभात्याग केला. स्थायी समितीने आदेश दिल्यावरही अधिकारी काम करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सभापती गजानन बारवाल यांनी दिला.

Maharashtra Times 14 Sep 2017, 3:08 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम warning to take action against officials
​ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

रेल्वे स्टेशन समोरील पेट्रोल पंप प्रकरणात काहीच कारवाई होत नसल्याबद्दल प्रशासनाचा निषेध करून शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी स्थायी समितीतून बुधवारी सभात्याग केला. स्थायी समितीने आदेश दिल्यावरही अधिकारी काम करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सभापती गजानन बारवाल यांनी दिला.

स्थायी समितीच्या बैठकीत सिद्धांत शिरसाट सातत्याने रेल्वे स्टेशनसमोरील पेट्रोलपंपाचा मुद्दा मांडत आहेत. या पंपाची जागा महापालिकेने संपादीत केली आहे. मोबदला देखील दिला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप हटवून जागा ताब्यात घ्या, अशी त्यांची मागणी आहे. पेट्रोल पंप मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, असे त्यांनी स्पष्ट केले होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ‘स्थायी’च्या बैठकीत शिरसाट यांनी हाच मुद्दा मांडला. तेव्हा तीन दिवसांत कारवाई करण्यात येईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार सभापतींनी देखील आदेश दिले. तीन दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या संदर्भात ‘मटा’ ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताचा संदर्भ देत शिरसाट यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा पेट्रोल पंपाचा मुद्दा मांडला. सभापतींनी दिलेले आदेश पाळले जात नाहीत, ही दुर्देवी बाब आहे असे ते म्हणाले. सभापतींनी उपायुक्त रवींद्र निकम यांना खुलासा करण्यास सांगितले. निकम यांनी वेगळाच खुलासा केला. त्यामुळे नगरसेवक संतापले.

कोर्टात जाणार
अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम. बी. काजी व विधीसल्लागार अपर्णा थेटे यांनाही सभापतींनी खुलासा करण्यास सांगितले. खुलासा करताना या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे सभापतींनी त्या पेट्रोलपंपावर त्वरित कारवाई करा, असे आदेश दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला. सिद्धांत शिरसाट यांनी याच संदर्भात उद्या आपण कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगत सभात्याग केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज