अ‍ॅपशहर

पतीवर चाकूहल्ला करत पत्नी मित्रासह पसार

पतीवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवत पत्नी मित्रासह पसार झाली. चिकलठाणा परिसरात रविवारी (१७ जून) ही घटना घडली असून जखमी झालेल्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले.

Maharashtra Times 20 Jun 2018, 6:45 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम knif


पतीवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवत पत्नी मित्रासह पसार झाली. चिकलठाणा परिसरात रविवारी (१७ जून) ही घटना घडली असून जखमी झालेल्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू असल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले.

भगवान दिवेकर (वय २७, रा. चिकलठाणा) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादीची पत्नी ही एका व्यक्तीसोबत घरासमोर गप्पा मारत होती. त्यावेळी फिर्यादीने सदरील व्यक्तीबाबत पत्नीकडे विचारणा केली असता पत्नीने त्यावरून जोरदार भांडण केले. त्यानंतर दरवाजाजवळ पडलेला भाजीपाला कापण्याचा चाकूने फिर्यादीवर हल्ला चढवला. तर पत्नीच्या मित्रानेही फिर्यादीला धक्का देत खाली पाडले. घटनेनंतर पत्नी तिच्या मित्रासह दुचाकीने पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या चाकू हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज