अ‍ॅपशहर

पतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात

मटा प्रतिनिधी, औरंगाबादमाहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत गर्भवती विवाहितेला मारहाण करण्यात आली...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत गर्भवती विवाहितेला मारहाण करण्यात आली. यावेळी पोटाला मार लागल्याने या विवाहितेचा गर्भपात झाला. बेगमपुरा भागात २५ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात शनिवारी पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा विवाह मे २०१७मध्ये आकाश देवीदास मानकापे याच्यासोबत झाला. लग्नानंतर चार महिने तिला चांगले वागवण्यात आले. यानंतर तिचा माहेरून दोन लाख रुपये व पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेऊन येण्याची मागणी करीत सासरच्या मंडळीनी छळ सुरू केला.

तिला २५ मे रोजी याच कारणावरून दुपारी अडीच वाजता मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित महिला गर्भवती होती. तिचा पती आकाश याने तिच्या पोटावर लाथा मारल्या. सासू व सासरे देवीदास मानकापे यांनी धक्काबुक्की केली. या मारहाणीमुळे महिलेच्या पोटात वेदना होऊन ३० मे रोजी तिचा गर्भपात झाला.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पती आकाश देवीदास मानकापे, सासरा देवीदास, सासू व इतर दोन महिलांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गर्भपात घडवून आणणे, हुंड्यासाठी छळ, मारहाण करणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय बदक याप्रकरणी तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज