अ‍ॅपशहर

मनोरुग्णाकडून महिला डॉक्टरला मारहाण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) सोमवारी रात्री ११ वाजेदरम्यान एका मनोरुग्णाने महिला निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली.

Maharashtra Times 14 Mar 2018, 3:35 pm
औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) सोमवारी रात्री ११ वाजेदरम्यान एका मनोरुग्णाने महिला निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. मनोरुग्ण असल्याने तसेच रुग्णाच्या कुटुंबियांनी माफीनामा लिहून दिल्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटले. दारुच्या व्यसनाने स्वादूपिंडाचा आजार जडलेल्या एका रुग्णाला सर्जरी वॉर्डात उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावताना तो जोरजोराने हातपाय आपटत होता. त्याला समजाविण्यास गेलेल्या महिला निवासी डॉक्टरला त्याने थापड मारली. यामुळे गोंधळ उडाला. मात्र, सदर रुग्ण मनोरुग्ण असल्याने तसेच कुटुंबियांनी माफीनामा लिहून दिल्याने सदर प्रकरण मिटविण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman doctor assaulted from mentally ill patient
मनोरुग्णाकडून महिला डॉक्टरला मारहाण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज