अ‍ॅपशहर

येरळ शिवारात तरूण बुडाला

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी गंगापूर तालुक्यातील येरळ शिवारात घडली संकेत नंदकिशोर निमोणे (वय १८) असे मृताचे नाव आहे...

Maharashtra Times 10 Sep 2018, 4:00 am

वैजापूर: तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी गंगापूर तालुक्यातील येरळ शिवारात घडली. संकेत नंदकिशोर निमोणे (वय १८) असे मृताचे नाव आहे. तो दुपारी दोन वाजेच्या सुमारास येरळ शिवारातील धरणात पाण्यात बुडाला. त्याला लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ऐन पोळ्याच्या सणाला घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज