औरंगाबाद : अंबरहिल येथे अमोल अशोक मिसाळ (वय २४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा एका पिझ्झाच्या शोरूममध्ये काम करीत होता. मात्र काही काळापासून त्याने तेथील नोकरी सोडली होती. तेव्हापासून तो घरीच होता. शुक्रवारी रात्री अमोलने जेवण केले. काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. शनिवारी सकाळी अमोल खोलीतून बाहेर न आल्याने पाहण्यासाठी गेले असता अमोलने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरहिल येथे युवकाची आत्महत्या
अंबरहिल येथे अमोल अशोक मिसाळ (वय २४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही...
Maharashtra Times 8 Jul 2018, 4:00 am