अ‍ॅपशहर

औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची मुसंडी

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकून अव्वल स्थान पटकाविले आहे. शिवसेनेने १८ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला. झेडपीचे अध्यक्षपद यावेळी भाजपला मिळणार आहे.

Maharashtra Times 24 Feb 2017, 6:13 am
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने २१ जागा जिंकून अव्वल स्थान पटकाविले आहे. शिवसेनेने १८ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला. झेडपीचे अध्यक्षपद यावेळी भाजपला मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zp election result of aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची मुसंडी


यावेळी मात्र पैठण वगळता सर्व तालुक्यांमधून भाजपचे उमेदवार निवडून आले. औरंगाबाद तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी दहा पैकी पाच जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले. फुलंब्री तालुक्यात तीन जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. खासदार चंद्रकांत खैरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी कन्नडची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पारड्यात केवळ दोन जागा आल्या. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी घवघवीत यश मिळविले. गंगापूरमध्ये चार जागा भाजपने जिंकल्या. खुलताबादमध्ये तर विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. पैठण तालुक्यात शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी नऊ पैकी सात जागा जिंकून ‘भाजपसाठी पैठण बहोत दूर है’ याची प्रचिती दिली. भाजपला गेल्या निवडणुकीत केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र हा आकडा २२ वर पोचल्याने भाजपने ग्रामीण भागात मुसंडी मारली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज