अ‍ॅपशहर

'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला'; निलेश राणेंवर मेहबूब शेख यांची जहरी टीका

दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची, अशी टीका राणे यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी खोचक टोला लगावला आहे.

Maharashtra Times 30 Nov 2021, 10:32 am
बीड : गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंब महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स करतानाच्या व्हायरल झालेले व्हिडिओ वरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यांच्या याच ट्विटला उत्तर देताना 'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला आहे', असा खोचक टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beed news
'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला'; निलेश राणेंवर मेहबूब शेख यांची जहरी टीका


संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि राऊत यांनी एकत्र डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून टीका करताना निलेश राणे म्हणाले होते की,' दारू वरची एक्साईज ड्युटी ५०% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करत आहेत.

नगर शहराला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाला वर्ष पूर्ण झाले, पण अजूनही...
दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची, अशी टीका राणे यांनी केली होती.

निलेश राणे यांच्या याच ट्विटला उत्तर देतांना मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "वैचारिक दृष्ट्या 'दीड फूट' उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच 'शिमग्याला' झालेला आहे वाटतं, कोणाच्याही बद्दल दोन्ही हातांनी बोंबलत बसण्या पलीकडे काही कर्तृत्व नाही," अशी जहरी टीका शेख यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज