अ‍ॅपशहर

कमी शेतीत लाखोचं उत्पन्न, मोसंबीच्या बागेने शेतकऱ्याचं आयुष्य बदललं

बीड जिल्ह्यात अनेक फळबागा देखील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मोसंबीचे पीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसाच एक अवलिया तब्बल अडीच एकरमध्ये तो काढतो. लाखोचे उत्पन्न कशा पद्धतीने त्यांनी ही फळबाग लावली जाणून घेऊया.

Maharashtra Times 6 Mar 2022, 3:38 pm
बीड : बीड जिल्हा म्हणलं की, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यात पारंपरिक पिकाला जास्त महत्त्व दिलं जातं. मात्र, असं असलं तरी बीड जिल्हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ यावर मात करत शेतकरी स्वतःची उपजीविका कशीबशी भागवतो. मात्र, आता गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी पीक बदलत आहे आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत आहे. बीड जिल्ह्यात अनेक फळबागा देखील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मोसंबीचे पीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसाच एक अवलिया तब्बल अडीच एकरमध्ये तो काढतो. लाखोचे उत्पन्न कशा पद्धतीने त्यांनी ही फळबाग लावली जाणून घेऊया.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farming idea


हे आहेत रामदास भिकाजी कोळेकर राहणार बीडपासुन २० केमी अंतरावर आसलेले बहादरपूर या बहादरपूरमध्ये अनेक ठिकाणी मोसंबीच्या फळबागा दिसतील. त्यामध्ये रामदास यांची अडीच एकर जमीन आहे. अडीच एकर जमिनीमध्ये जवळजवळ चारशे मोसंबीची झाडे आहेत आणि आता त्यात चारशे मोसंबी झाडांना जवळजवळ दहा लाखापर्यंत उत्पन्न त्या झाडांवर आहे गेल्या पाच वर्षांपूर्वी ही झाडे लावली आणि दरवर्षी एक लाख रुपये उत्पन्न काढत-काढत आता पाच वर्षानंतर तब्बल दहा लाख रुपये ते काढत आहेत.

मनपा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का; माजी गटनेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
फळबाग म्हणलं की, मोठ्या प्रमाणात निगरानी आली खूप पैसा जातो असंही वाटतं. मात्र, पाण्याचाही प्रश्न निर्माण होतो आणि मोसंबी म्हणलं की बराच संभ्रम निर्माण होतो. तसं काही नसून कमी पाण्यात कमी खर्चात हे मोसंबीचे पीक घेतलं जाऊ शकतं. त्यामध्ये खत वापरतानादेखील तुम्ही काय खात वापरायचं हे देखील ठरवून जर केलं तर ही शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.

मोसंबीच्या पिकाला एक तास जरी पाणी मिळालं तरी मोसंबीची बाग बहरू शकते. कमी खर्चातून केलेला मोसंबीचा व्यवसाय शेतकऱ्याला लाभदायक ठरणार आहे. कमी खर्चात कमी जागेत आणि लाखाचे उत्पादन हे शेतकऱ्यांना मनापासून वाचू शकतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज