अ‍ॅपशहर

बीडमध्ये १० रुपयांत मिळतेय भाड्यावर हेल्मेट; काय आहे नेमकं प्रकरण?

पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचे करण्यात आलं आहे. मात्र बीडमध्ये याच शासन निर्णयास धाब्यावर बसवून, सर्रास पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्त्वावर हेल्मेट दिले जात आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2022, 3:21 pm

हायलाइट्स:

  • बीड जिल्ह्यामध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल
  • नव्या नियमामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
  • बीडमध्ये १० रुपयांत मिळतेय हेल्मेट
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beed
बीडः बीड जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती लागू केलेली आहे. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही असा नियम लागू केल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकीकडे करोनाचे नियम लागू केले असताना दुसरीकडे हेल्मेट सक्ती लागू केल्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अचानक पद्धतीने प्रशासनाकडून हेल्मेट नसणाऱ्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिला जात नाही परिणामी वाहन धारकाचे अचानकपणे तारांबळ उडाली आहे. तर, एकीकडे शासनाच्या या निर्णयास धाब्यावर बसवून पेट्रोल पंपाबाहेर दहा रुपये भाडेतत्वावर हेल्मेट दिले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेल्मेट सक्तीचे आदेश बीडच्या सर्वच पेट्रोल पंपावर झळकत असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेते तेच तेच वापरलेले हेल्मेट ग्राहकांना देत असल्यानं करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या मुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांची पायमल्ली तर होतच आहे. मात्र, त्यामुळे करोनाला पुन्हा आमंत्रण दिलं जात असल्याची शक्यता नाकारत येत नाही.

वाचाः 'कमलापूर हत्तीकॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार?'

पेट्रोल पंपाच्याबाहेर काही जण भाड्याने दिलं जात आहे. हे हेल्मेट वापरुन पेट्रोल घेतले जातं आहे. मात्र, या हेल्मेटसाठी पैसे आकारले जात आहेत. हे देखील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा मोठं धाडस म्हणावा लागेल. मात्र याकडे अद्यापही कोणाचं लक्ष नसल्याचं दिसून आला आहे.

दरम्यान, पेट्रोल विक्रेत्यांना अनेक संकटांना या निर्णयामुळे तोंड द्यावे लागत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी पेट्रोल पंप धारक यांची अशी मागणी येत आहे की दिवसभर अनेक जणांना पेट्रोल साठी तोंड द्यावे लागत आहे. मात्र यामध्ये अनेक वाद देखील होता आहेत. पेट्रोल पंपाला पोलिस संरक्षण देऊन हा निर्णय पुढे कायम करावा असही पेट्रोल विक्रेत्यांकडून बोलले जात आहे. मात्र नागरिकांमध्ये वेगळा संताप पाहायला मिळतोय जवळजवळ बऱ्याच नागरिकांना हा नियम सरकारने लागू केला आहे हेच माहित नाही. एकीकडे करोनाचे नियम आम्ही पळत आहोत दुसरीकडे हेल्मेटची सक्ती का अनेक अडचणी असतात दिवसभरामध्ये त्याच्यासाठी पेट्रोल आवश्यक आहे आणि तेच मिळत नसेल तर या सरकारचा फायदा कसला असंही नागरिकांतून बोलले जात आहे.

वाचाः औरंगाबाद पुन्हा हादरले; तरुणाचा दगडाने ठेचून केला खून, नंतर...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज