अ‍ॅपशहर

dr. sudam munde : बेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक

देशभर गाजलेल्या स्त्री भ्रूण हत्येतील (female foeticide) आरोपी डॉ. सुदाम मुंडेच्या (dr. sudam munde) दवाखान्यावर छापा मारण्यात आला असून बेकायदेशीररित्या प्रॅक्टिस केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 12:18 pm
बीड: स्त्री भ्रूण हत्याप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. सुदाम मुंडेला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानंतर मुंडेच्या परळी येथील दवाखान्यावर आज सकाळीच छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम munde dr
dr. sudam munde : बेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक


डॉ. सुदाम मुंडे पुन्हा प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आली होती. त्यानंतर त्यांनी या कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस आणि आरोग्य पथकाने आज परळीतील त्याच्या दवाखान्यात छापा टाकला. सुदाम मुंडे हा त्याच्या डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने प्रॅक्टिस करत असल्याचं आढळून आलं असून त्याच्या हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. देशभर गाजलेल्या स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी मुंडे दाम्पत्यांची वैद्यकीय पदवी रद्द करण्यात आलेली आहे.

२०१२ साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी ठोठावण्यात आली होती. मात्र अन्य १० जणांची निर्दोष मुक्तता झाली होती. स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले होते. भारतीय दंड विधानाच्या ३१२,३१३,३१४,३१५,,तसेच ३१८ एम टी पी ऍक्ट ३,५ कलम नुसार या तिघांना दोषी ठरवत दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड ठोठावला होता. मे २०१२ मध्ये विजयमला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णालयात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता.

परळी अवैध गर्भपात: डॉ. सुदाम मुंडेला १० वर्ष सक्तमजुरी

धारूर तालुक्यातील महिला विजयमाला पटेकर या महिलेचा १८ मे २०१२ रोजी गर्भपात करीत असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणातल्या १७ आरोपींपैकी चार आरोपी मृत झाले होते तर उर्वरीत दहा आरोपी सबळ पुराव्या अभावी निर्दोष ठरले होते. या प्रकरणी शवविच्छेदन करणारे डॉक्टर, पोलीस निरीक्षक गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉक्टर गौरी राठोड तसेच जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी शासकीय पंच यांची साक्ष गुन्हा शाबूत करण्यास महत्वाची ठरली होती.

देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; राऊत यांचा हल्लाबोल

खडसे हे भाजपचे बाहुबली; त्यांना कट्टापाने मारले: अब्दुल सत्तार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज