अ‍ॅपशहर

गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

Maharashtra Times 17 Apr 2017, 1:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बीड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pankaja munde shows special affection towards home ministry
गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी झालं. त्यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळात नवी पुडी सोडली.

गृह खातं माझं आवडतं खातं आहे. माझ्या वडिलांनी - गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांनी केलेलं काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे या खात्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. हे खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या गृह खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडील खात्यावरच दावा सांगून पंकजा यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जातोय. पंकजा यांच्या इच्छेला पक्षश्रेष्ठींकडून काय प्रतिसाद मिळतो, याबद्दलही उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज