अ‍ॅपशहर

दहा दिवसांची झुंज अपयशी; अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाचा मृत्यू

जितेंद्र झंवर हे अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट व्यापारी तथा पूजा डिस्ट्रीब्यूटरचे मालक आहेत. व्यावसायिक काम आटोपून ते कुटुंबांसह औरंगाबादहून अंबाजोगाईकडे येत असताना ३० सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास भेट जवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारची ट्रकसोबत धडक झाली होती.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2022, 4:15 pm
बीड: अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झंवर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेली त्यांची मुलगी ऋतुजा (वय १९) तिच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. मात्र, ऋतुजाची झुंज अपयशी ठरली असून दहा दिवसानंतर तिचा आज सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beed accident news
दहा दिवसांची झुंज अपयशी; अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाचा मृत्यू


जितेंद्र झंवर हे अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट व्यापारी तथा पूजा डिस्ट्रीब्यूटरचे मालक आहेत. व्यावसायिक काम आटोपून ते कुटुंबांसह औरंगाबादहून अंबाजोगाईकडे येत असताना ३० सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास भेट जवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारची ट्रकसोबत धडक झाली होती. या भीषण अपघातात जितेंद्र झंवर यांची पत्नी ज्योती (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मुलगी ऋतुजा (वय १९) ही गंभीर जखमी झाली होती.

हेही वाचा -आधी मोबाईलवर चॅटिंग, नंतर न्यूड कॉलिंग! मानसिक त्रास वाढल्याने पुण्यातील तरुणाने जीवन संपवले

जखमी ऋतुजाला तातडीने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना ऋतुजाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. झंवर परिवारावर झालेल्या या अपघाताबद्दल अंबाजोगाई शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -जिल्हा रुग्णालयात जीन्स-टी-शर्ट घालून याल तर थेट कारवाई, मुंढेंनी चार्ज घेताच नवे आदेश

महत्वाचे लेख