अ‍ॅपशहर

बीडमध्ये विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात, पतीने दिल्या भलत्याच गोळ्या; धक्कादायक कारण समोर

Beed Crime News: बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशिक्षित कुटुंबातील लोकांनी सुनेचा इच्छेविरुद्ध गर्भपात केला आहे. या प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळं हुंड्याच्या समस्येचे भीषण वास्तव समोर आलं आहे.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2022, 12:14 pm
बीडः पतीने भलत्याच गोळ्या खायला देऊन पत्नीचा इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आल आहे. धक्कादायक म्हणजे १० लाख रुपये हुंडा घेवून ये, अशी पत्नीकडे मागणी करत तिला बेल्टने मारहाण केली. तसंच, हुंड्यासाठी छळ केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पतीसह सासू सासऱ्यांवर संमतीशिवाय गर्भपात व कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Crime News In Marathi)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abortion


ऋषीकेश नागरगोजे असं आरोपीचं नाव आहे. ऋषीकेश हा नामांकित कंपनीत काम करत असूनही हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत असल्याचा प्रकार समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, ऋषीकेशचे आई- वडिलही चांगल्या हुद्द्यावर आहेत. शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात हा सगळा प्रकार घडल्याने हुंड्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

वाचाः पुण्यात मंदिराबाहेर सुरू धक्कादायक प्रकार, छापा टाकताच पोलीस चक्रावले

१२ मे २०१९ रोजी ऋषीकेश नागरगोजेचा विवाह पीडितेशी झाला. ऋषीकेश हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी आहे. तर, आरोपीचे वडिल भागवत दशरथ नागरगोजे जिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सासू अनिता भागवत नागरगोजे शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. लग्नात पीडितेच्या आई-वडिलांनी सहा लाख १७ हजार १९९ रुपयांचे १९ तोळे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिले होते.

वाचाः अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास...; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

पत्नी गर्भवती असल्याचे निदान झाल्यावर ऋषीकेशने तिला दवाखान्यातच नेले नाही. त्यानंतर सतत दीड महिना त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय भलत्याच गोळ्या खायला दिल्या. यामुळं पत्नीचा रक्तस्राव वाढला. रक्तस्त्राव वाढल्याने आणि अधिक त्रास होत असल्यानं तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा गर्भपात झाला. पतीने इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप यावेळी पीडितेनं केला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती आणि सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधित तपास करत आहेत.

वाचाः १५० लोकांची करोडोंची फसवणूक करत संपवलं जीवन, पोलिस शोधत होते मृतदेह, नंतर समोर आलं वेगळेच सत्य
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख