अ‍ॅपशहर

ट्रकने ऑटोला उडवलं, चालक जागीच ठार, ५ जण जखमी

नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ट्रक आणि ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 18 Feb 2022, 8:50 pm
बुलडाणा : नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ट्रक आणि ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra buldhana Accident between truck auto rickshaw 1 death 5 injured


नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुराकडून खामगावकडे प्रवासी जात होते. याच नांदुराकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये ऑटो चालक प्रशांत अरुण साळुंखे (वय 28 राहणार शिवाजी नगर खामगाव) या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

ऑटोला धडक देऊन ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला. यामुळे मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत सायंकाळी सामान्य रुग्नालयासमोर खामगाव- शेगाव राष्ट्रीय महामार्गावर बसून रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा बराच वेळ प्रयत्न केला मात्र नागरिक आपल्या मागणीवर ठाम होते. नगरसेवक प्रवीण कदम यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर 1 तासांनी नागरिकांनी आंदोलन थांबविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज