अ‍ॅपशहर

या हसऱ्या चेहऱ्याने २२ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, आठ महिन्यांची पोर मायेला मुकली

Buldana News : आठ महिन्यांपूर्वी राधिकाला मुलगी झाली. लेकीला होणारा त्रास बघून राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी सासरकडील मंडळींसोबत दोन वेळेस बैठका घेऊन काही पैसे दिले होते. मात्र तरीसुद्धा सासरची मंडळी राधिकाचा छळ करीत होते.

Authored byअनिश बेंद्रे | Reported by अमोल सराफ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 8:23 pm

हायलाइट्स:

  • बुलडाण्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
  • हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
  • आठ महिन्यांची मुलगी झाली पोरकी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
बुलढाणा : हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं. सासरच्या जाचामुळे २२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन तिने जीवन यात्रा संपवली.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दुर्गम देऊळगाव माळी येथे ३० सप्टेंबर रोजी ही दुःखद घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मयत महिलेच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे. राधिका पवन खेत्री (वय वर्ष २२) असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. राधिकाला अवघ्या आठ महिन्यांची चिमुकली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दीड वर्षांपूर्वी राधिकाचा विवाह पवन विश्वनाथ खेत्रे याच्यासोबत झाला होता. विवाह झाल्यापासून पती व सासरची मंडळी राधिकाला सतत माहेरुन पैसे आणण्याकरता तगादा लावत होते.

दरम्यान आठ महिन्यांपूर्वी राधिकाला मुलगी झाली. लेकीला होणारा त्रास बघून राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी सासरकडील मंडळींसोबत दोन वेळेस बैठका घेऊन काही पैसे दिले होते. मात्र तरीसुद्धा सासरची मंडळी राधिकाचा छळ करीत होते. यामध्ये राधिकाच्या पतीचा देखील समावेश होता.

हेही वाचा : गरबा खेळताना लेक कोसळला, बापाला मानसिक धक्का, विरारमध्ये पितापुत्राचा करुण अंत

सततच मानसिक छळ होत असल्याने अखेर राधिकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. एकंदरीत मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या राधिकाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

दरम्यान राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राधिकाच्या पती सह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या ५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा : जनता कुणाच्या बाजूने, पहिला फैसला ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच, अंधेरीत कोणाचं पारडं जड?
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख