अ‍ॅपशहर

ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू

ड्युटीवर जात असल्याचे सांगून गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास युवती घरातून निघाली, मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2023, 10:43 am
बुलढाणा : बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Buldhana Girl Dies after falling from Train 900
बुलढाण्यातील तरुणीचा रेल्वेतून पडून मृत्यू


बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील २६ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मावशी मीना रामकृष्ण जाधव यांनी ३० मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता तरुणी पूर्णिमा दिनकर इंगळे बुलढाणा येथील सखी वन स्टॉप या कार्यालयात पॅरामेडिकल विभागात कार्यरत होती.

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं
ड्युटीवर जात आहे असे सांगून गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली, मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही. ती मिळून न आल्याने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.


भुसावळ जीआरपीकडून बुलढाणा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली की एका तरुणीचा मृतदेह भुसावळ–जळगावच्या दरम्यान पाळधी रेल्वे स्टेशन जवळ मिळून आला असून सदर तरुणीचे नाव पूर्णिमा इंगळे आहे. मृतकाजवळ मलकापूर ते जळगाव प्रवासाचे तिकीट आढळून आले व ती गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करीत असताना खाली पडल्याची माहिती भुसावळ जीआरपीचे पीआय गिरडे यांनी दिली.

महत्वाचे लेख