अ‍ॅपशहर

ST Bus : रात्रीच्या अंधारात धक्कादायक घटना; एसटी बस चोरून नेली, पण २ किमी अंतरावर जाताच...

Buldhana News Today : एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिली. हे प्रकरण समोर आल्यानंतर एसटी प्रशासनातही चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2022, 10:36 am
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देऊळगाव राजा येथील बस स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञाताने चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत एसटी बस चालकाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास करत चोरीला गेलेली बस शोधून काढली आहे. मात्र ही बस कोणी आणि का पळवली होती, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम buldhana msrtc bus news
एसटी बस चोरी प्रकरण


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा बस स्थानकात MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस उभी करून बसचे चालक आणि वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते. यावेळी अज्ञाताने ही बस गायब केली. याबाबत एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिली. हे प्रकरण समोर आल्यानंतर एसटी प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा गर्व, ब्राह्मण महापुरुष, स्वातंत्र्यासाठी त्यांचं मोठं काम: अमृता फडणवीस

चोरी केलेली बस चिखली मार्गाने नेत असताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळला. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत ही बस रस्त्यात उभी करून अज्ञात चोरट्याने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन या प्रकरणी चौकशी सुरू ठेवली आहे. मात्र याबाबतीत अधिक माहिती देणअयास एसटी कर्मचारी आणि पोलिसांनी नकार दिला.

दरम्यान, एसटी बस स्थानकातूनच बस चोरीला गेल्याने या घटनेची शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

महत्वाचे लेख