अ‍ॅपशहर

बुलडाण्यात ३ वाहनांचा विचित्र अपघात, ४ जण जागीच ठार तर ७ गंभीर जखमी

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Maharashtra Times 26 Oct 2021, 1:47 pm
बुलडाणा : जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झाला आहे. यात ४ जण जागीच ठार झालेत तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टाटा सुमोचा चुराडा झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम buldana accident news today


वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात घडला. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व आणि टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला.
बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज